दिन हा सोनियाचा साडेतीन मुहूर्ताचा
याच शुभमुहूर्ति उत्कर्ष होवो तुमचा
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा .
हिंदू मान्यतेनुसार साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून अक्षय तृतीया Akshay Tritiya 2024 या दिवसाला खूप महत्त्व आहे. अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारे म्हणजेच कधीच न संपणारे अशा या अक्षय तृतीयेला हिंदू मान्यतेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. Akshay tritiya wishes in Marathi 2024
Akshay Tritiya Status In Marathi,Akshaya Tritiya Quotes In Marathi अक्षय तृतीया शुभेच्छा मेसेज Akshay Tritiya Marathi Shubhechha Akshaya Tritiya Greetings In Marathi
वैशाखातील शुक्ल पक्षातील तिसरा दिवस अक्षय तृतीया म्हणून साजरा केला जातो. श्री परशुरामांची जयंतीही याच मुहूर्तावर असते. पौराणिक कथा नुसार अशी मान्यता आहे की अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जे कार्य हाती घे घेतले जाईल ते पूर्णत्वास जाईल व अक्षय राहील . म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्याही शुभकार्य हाती घेतले जाते .
घरातील पूजा असो किंवा गृहप्रवेशाचा मुहूर्त याच दिवशी केला जातो . मोठ-मोठी दुकाने कंपन्या तसेच नव्या कामाची कार्यालय याच मुहूर्तावर सुरू केली जातात. खास करून महाराष्ट्रात नवीन व्यवसायाची सुरुवात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरच केली जाते सर्वसाधारणपणे अशी मान्यता आहे की अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सुरू केलेले काम फलदायी ठरते उद्योगधंद्याची भरभराट होते आणि त्या कार्याला कधी क्षय पोहोचत नाही म्हणजेच कधीच नुकसान होत नाही.
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा :
अक्षय तृतीयेच्या या शुभ दिनी तुमच्या जिवलगांना तसेच नातलगांना खास मराठमोळ्या शुभेच्छा नक्की द्या .Akshay tritiya wishes in Marathi
दिन हा सोनियाचा साडेतीन मुहूर्ताचा
याच शुभमुहूर्ति उत्कर्ष होवो तुमचा
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा .
अक्षय तृतीयेच्या या मंगलदिनी तुम्हाला ऐश्वर्य , संपत्ती ,आरोग्य , सुख शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा .
दिन आला सोनियाचा किती हा भाग्याचा, साडेतीन मुहूर्ताचा विश्वास आहे परंपरेचा ,याच शुभ दिनी आनंद ऐश्वर्या संपत्ती लाभो तुम्हास हाच आहे संकल्प आमचा.
विश्वास आहे परंपरेचा .. आपल्या संस्कृतीचा, पवित्र सण हा अक्षय तृतीयेचा उत्कर्ष होऊ सर्वांचा अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा .
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या या शुभ दिनी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत आणि तुम्हाला सुख समाधान ऐश्वर्या लाभो हीच मंगल कामना.