तुम्ही आईस्क्रीम च्या नावाखाली पामतेल तर खात नाही ना ?

0
2431

आईस्क्रीम विश्वात खळबळ माजवणारा खटला म्हणजे अमूल आणि क्वालिटी वाल्स मध्ये गाजलेली केस. या केसमुळे आईस्क्रीम प्रेमींचा एकप्रकारे फायदाच झाला . फायद्याची गोष्ट अशी कि आईस्क्रीम प्रेमींना आपण नक्की आईस्क्रीम खातो कि इतर भेसळ असलेला पदार्थ हे कळून चुकलं . आता तुम्ही म्हणाल आईस्क्रीम मध्ये तरी काय भेसळ करणार तर खरी गम्मत यातच आहे . Ice cream Vs Frogen Desert

तर संपूर्ण आशिया खंडात  दूध आणि दुगजन्य पदार्थ उत्पादनात बाप असणाऱ्या अमूल चा असा दावा होता कि खरी आईस्क्रीम फक्त आम्हीच बनवतो …. आता तुम्ही सुद्धा विचार करत असाल कि अमूल खरी आईस्क्रीम बनवते मग बाकी आईस्क्रीम कंपनी काय लोणचं बनवतात कि काय ??? वाचून हसू आलं असेल पण बाकी आईस्क्रीम कंपनी लोणचं नाही बनवत तर आपल्याला म्हणजेच सामान्य ग्राहकाला बनवतात म्हणजेच गंडवतात .

अमूलने क्वालिटी वाल्स वर कोर्टात केलेल्या दाव्यानुसार फक्त  अमूल कंपनीचं अस्सल आईस्क्रीम बनवते . अमूल च्या दाव्यानुसार त्यांच्या आईस्क्रीम मध्ये १०० टक्के दूध असते म्हणजे त्यांची आईस्क्रीम दुधापासून बनते आणि इतर कंपन्यांची आईस्क्रीम पामतेल ,वनस्पती तूप किंवा डालड्या पासून बनते आणि त्या पदार्थाला तुम्ही आईस्क्रीम नव्हे तर फ्रोजन डेझर्ट frogen dessert म्हणजेच गोठवलेलं गोड पदार्थ म्हणू शकता पण आईस्क्रीम म्हणून शकत नाही . असा रंजक खटला आणि माहिती   ऐकून हादरलात  ना पण हे सत्य आहे . Amul – Quality walls Case

अश्याप्रकारे अमूल ने इतर कंपन्या विरुद्ध आईस्क्रीम vs फ्रोजन डेझर्ट हा खटला जिंकून दूध आणि दुगजन्य पदार्थ उत्पादनात आपणच  बाप आहोत हे सिद्ध केलं . उगाच नाही अमूल आपल्या जाहिरातीत सांगत real  milk real ice cream .

तर मग यापुढे आईस्क्रीम खातांना पाकिटावर नेहमी आईस्क्रीम कि फ्रोजन डेझर्ट हे शब्द बघूनच खरेदी करा .

One of the most sensational cases in the ice cream world is the case between Amul and Quality Walls. Due to this case, the ice cream lovers benefited in a way. The good thing is that ice cream lovers do not know whether they are eating ice cream or other adulterated food. Now you will say that what will be adulterated in the ice cream, but the real trick lies in this.

So Amul who is the father of milk and dairy products in the whole of Asia claimed that only we make real ice cream…. Now you are also thinking that Amul makes real ice cream then what other ice cream companies make pickles or what??? You may have laughed after reading this, but the rest of the ice cream companies are not making pickles, but they are making us, the common consumer, a mess.

According to Amul’s lawsuit against Quality Walls, only Amul makes the company’s genuine ice cream. According to Amul’s claim, their ice cream contains 100 percent milk, which means their ice cream is made from milk, and other companies’ ice cream is made from palm oil, vegetable ghee or dalya, and you can call that product not ice cream, but frozen dessert, frozen dessert, but not ice cream. You are shocked to hear such an interesting case and information but this is the truth.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image