तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे काम आहे आणि अशाच वेळेला तुमच्या मोबाईलची battery संपते असं तुमच्या बाबतीत कधी झालं आहे का ?किंवा घरातून तुम्ही मोबाईलची बॅटरी फुल चार्ज करून निघतात आणि संध्याकाळ होईपर्यंत मोबाईलची बॅटरी पूर्णपणे संपून मोबाईल बंद पडतो . जर तुम्हाला अशाच प्रकारच्या मोबाईलच्या बॅटरी संबंधित अडचणी असतील तर हा ब्लॉग नक्कीच तुम्हाला तुमच्या मोबाईलची बॅटरी लाईफ दुप्पट करण्याचे उपाय दाखवून देईल.cell phone plans.
तुमचा मोबाईल Samsung ,Apple iphone ,Oppo-Vivo किंवा xiaomi LG oneplus Nokia चा असो बॅटरी चा प्रॉब्लेम सर्वच फोनला असतो BlackBerry Reno Motorola किंवा कोणत्याही Android phone ची बॅटरी आपल्याला सतावत राहतेच .
या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला अशा काही ट्रिक्स आणि टिप्स सांगणार आहे की ज्यामुळे तुमच्या मोबाईलची बॅटरी लाइफ दुप्पट होईलच त्याचबरोबर तुमच्या मोबाईलची बॅटरी लवकर खराब होणार नाही .
1. तुमच्या मोबाईल मध्ये तुम्हाला एक सेटिंग करायची आहे त्यासाठी सेटिंग मेनू मध्ये जाऊन sound and vibration सिलेक्ट करावे.आता खाली स्क्रोल करून haptics and tones ऑप्शन निवडावे, यामध्ये system haptics ऑप्शन on असेल तो ऑप्शन बंद करावा. या सेटिंग मुळे टच स्क्रीन साऊंड आणि व्हायब्रेशन बंद होऊन त्यासाठी लागणारी बॅटरी खर्च होणार नाही.
2. Settings मध्ये जाऊन Location ऑप्शन निवडावे, त्या ऑप्शन मध्ये लोकेशन वर क्लिक करून wifi and bluetooth scanning ऑप्शन वर क्लिक करावे इथे तुम्हाला वायफाय स्कॅनिंग आणि ब्लूटूथ स्कॅनिंग हे दोन्ही ऑप्शन On दिसतील हे ऑप्शन तुम्ही Off करा यामुळे फालतू मध्ये वायफाय आणि ब्लूटूथ स्कॅनिंग साठी खर्च होणारी बॅटरी वाचेल .
3.मोबाईलची थीम निवडताना नेहमी ब्लॅक कलरची निवडावी मोबाईलची स्क्रीन म्हणजे लाखो एलईडी पासून बनलेली असते त्यामुळे जर तुम्ही व्हाईट कलरची किंवा इतर रंगाची थीम ठेवली असेल तर त्या ठिकाणी एलईडी लाईट ऑन राहून बॅटरी मोठ्या प्रमाणात खर्च होते हेच जर तुम्ही ब्लॅक कलरची थीम ठेवली तर तेथील एलईडी बंद राहून बॅटरी खर्च होत नाही.
4. मोबाईल मधील ब्राईटनेची सेटिंग नेहमी ऑटो मोडवर ठेवावी आणि विशेषता रात्रीच्या वेळी ब्राईटनेस दहा ते पंधरा टक्क्यांवर ठेवावी त्यामुळे बॅटरी मध्ये मोठ्या प्रमाणात बचत होते.
5.मोबाईल सकाळी एकदा शंभर टक्के चार्ज करून घ्यावा पुन्हा पुन्हा मोबाईल चार्जिंगला लावल्यास मोबाईल मधील बॅटरी सायकल विस्कळीत होऊन त्याचा परिणाम तुमच्या मोबाईलच्या बॅटरीवर होऊ शकतो रात्री मोबाईल चार्जिंगला ठेवून झोपणे हे तुमच्यासाठी तसेच तुमच्या मोबाईलच्या लाईफ साठी खूपच धोकादायक आहे ओव्हर चार्जिंग मुळे मोबाईलची बॅटरी निकामी किंवा स्फोट होण्याची शक्यता असते मोबाईलची बॅटरी 50 टक्क्याहून खाली आल्यास नेहमी पावर सेविंग मोड चा उपयोग करावा.