Cloud Kitchen बिजनेस आयडिया खाद्यपदार्थ घरी बनवा ऑनलाईन विका .

0
862
cloud kitchen
home food busines

क्लाऊड किचन ने शुभारंभ करा नव्या घरगुती बिजनेस चा .

घरात बसून काही फायदेशीर आणि कमी गुंतवणुकीचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर मी तुम्हाला नक्कीच मदत करणार .cloud kitchen business modelजर तुमच्या हाताला चव असेल आणि मेहनत करून कमावण्याची जिद्द असेल तर नक्कीच अश्याप्रकारे केलेले घरगुती व्यवसाय तुम्हाला लाखो रुपये कमावून देऊ शकतात . मोदक , चिवडा ,चकल्या , अनारसे , बिर्याणी, घरगुती पद्धतीचे चिकन स्टार्टर , फिश थाळी , कोंकण मेवा , पुरणपोळ्या असे एक ना अनेक पदार्थाना मार्केट मध्ये प्रचंड मागणी आहे . तुम्हाला फक्त योग्य ग्राहकांपर्यंत ते पोहचवता आले पाहिजे . यासाठी या ब्लॉग मधून मी तुम्हाला क्लाऊड किचन कन्सेप्ट समजवण्यास मदत करणार आहे .cloud kitchen consultant

ऑनलाईन व्यवसायात प्रचंड गाजलेले बिजनेस मॉडेल म्हणजेच cloud kitchen .जर तुम्ही उत्तम जेवण , खाद्यपदार्थ , बेकरी प्रॉडक्ट , फराळाचे पदार्थ , डाएट फूड बनवू शकत असाल तर हा व्यवसाय करून तुम्ही महिन्याला काही हजाराहून लाखोंपर्यंत जास्त कमावू शकता . या व्यवसायात गुंतवणूक मूल्य खूपच कमी आहे .home kitchen business home caterers

cloud kitchen म्हणजे नेमकं काय ?

खूपच सोप्प्या भाषेत सांगायचे झाल्यास तुम्ही तुमचे खाद्यपदार्थ कोणत्याच प्रकारचे हॉटेल किंवा खानावळ सुरु न करता थेट घरातून ऑनलाईन पद्धतीने विक्री करू शकता . cloud kitchen पार्टनर च्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर्स मिळणार आणि त्यांच्याच मदतीने ग्राहकांपर्यंत ऑर्डर्स पोहचणार .खाद्यपदार्थ ऑनलाईन माध्यमातून ग्राहकांपर्यंत कमी वेळात पोहचवणे हे मुख्य उद्धिष्ट असलेले बिजनेस मॉडेल म्हणजेच क्लाऊड किचन .

cloud kitchen काम कसे करते ? cloud kitchen meaning in marathi 

स्टेप १ : तुम्हाला कोणते खाद्यपदार्थ विक्री करायचे आहेत त्याची लिस्ट म्हणजेच मेन्यूकार्ड तयार करा . सुरुवातीला मोजकेच पदार्थ असावेत .

स्टेप २ : तुमची स्वतःची वेबसाईट तयार करा किंवा swiggy kitchen, zomato , eatsure , ubereats , foodpanda, faasos cloud kitchenयांच्या वेबसाईटवर तुमच्या व्यवसायाची नोंदणी करा .

नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागपत्रे : FSSAI लायसेन्स , गुमास्ता , पॅन कार्ड . बँक अकाऊंट
एकदा का नोंदणी झाली कि तुम्ही स्वतःच्या वेबसाईटवर किंवा फूड पार्टनर अँप वर स्वतःचे मेन्यूकार्ड अपलोड करा त्यात खाद्यपदार्थांचे आकर्षक फोटो किमतीसह हवेत .

३. ऑर्डर स्वीकारा आणि बिजनेस करा : एकदा सर्व नोंदणी प्रकिया पूर्ण झाल्यावर . तुमचे बिजनेस लाईव्ह करा त्यामुळेतुम्हाला ऑनलाईन ऑर्डर स्वीकारता येणार . swiggy , zomato , rebel foods private limited सारख्या पार्टनर अँप वर ऑर्डर आल्यास accept करा आणि डिस्पोजिबल कंटेनर . ऍल्यु फॉईल इत्यादी साहित्य वापरून तुमचे खाद्यपदार्थ नीट पॅक करून रेडी राहा . फूड डिलिव्हरी पार्टनर कडून पॅक केलेली ऑर्डर काही मिनिटात तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहचवली जाते .

४. आर्थिक व्यवहार : तुमचे खाद्यपर्दार्थ विकण्यासाठी तुम्ही ज्या पार्टनर शी जोडले गेले असाल उदा. (swiggy , zomato ) त्या पार्टनर कडून नोंदणी करतेवेळी तुमचे सर्व डिटेल्स घेतले जातील . त्यांचे कमिशन आणि डिलिव्हरी फी तसेच टॅक्स कट करून उरलेली रक्कम तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाईल .

महत्वाची सूचना : क्लाऊड किचन व्यवसायात तुमची स्वतःची स्वतंत्र वेबसाईट आणि लोकल एरिया मध्ये डिलिव्हरी करण्यासाठी डिलिव्हरी बॉय ची व्यवस्था जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही खूप जास्त नफा कमवू शकता .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image