बाराखडी आयोजित कॅलीग्राफी(सुलेखन) Calligraphy शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरणनिमित्ताने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या मार्गदर्शिका सुलेखनकार रेवती नातू होत्या. त्यांच्या सोबत मैथिली गंग्रस यादेखील आल्या होत्या.
शिबिरात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना तसेच चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना दत्तात्रय शिंदे सरांकडून त्यांनी लिहिलेले ‘माझा परिपाठ’ हे पुस्तक भेट देण्यात आलं. शिंदे सरांनी मुलांशी संवाद साधला. त्यांना मार्गदर्शन केलं.
रेवती आणि मैथिली यांनी मुलांशी गप्पा मारत शिबीर सुरु केलं.
विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. गप्पा असल्यामुळे मुलं आनंदाने सर्व करत होते आणि या निमित्ताने त्यांना एक वेगळा विषय शिकण्यास मिळत होता. या शिबिरास एकूण पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यासोबतच प्रौढ वर्गही जोडला गेला होता हे विशेष.
चित्रकला स्पर्धेत क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून पुस्तक भेट देण्यात आलं. कॅलीग्राफी शिबीराला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता.
– टीम बाराखडी
बाराखडी संस्थेचा मुख्यतः शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याचा मानस आहे आणि त्यापद्धतीने वाटचाल सुरू आहे. तसेच इतरही सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न संस्थेतर्फे होत असतो. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी तलासरी व आसपासच्या भागातील वाचकांसाठी उंबरगाव येथे वाचनालय २०२१ पासून सुरु आहे. विद्यार्थ्याने अवांतर वाचन करून स्वतःस समृद्ध करावे हा त्यामागचा प्रयत्न आहे. शाळांतून वाचक वर्ग जमवून वाचकांची साखळी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
उत्सव कलाम, पुस्तक प्रदर्शन, पुस्तकांची शिदोरी, शाळा व संस्था भेट आणि एक दिवस छंदाचा असे उपक्रम बाराखडी राबवत असते.