मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना CM Relief fund
मुख्यमंत्री सहाय्यता निधी या योजने अंतर्गत समजतील दुर्बल घटकांना आपत्तीच्या काळात आर्थिक हातभार मिळावा म्हणून हि योजना राबवली जात आहे .मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून वैद्यकीय उपचारासाठी साडेतीन लाखापर्यंत मदत देण्यात येते.
जर आपण आरोग्यविमा health insurance नसेल काढला तर आपत्तीच्या वेळी ही योजना आपल्याला खूप फायदेशीर ठरते .
कोणत्या आजारांसाठी या योजनेद्वाराने आर्थिक सहाय मिळते ?
1.अपघात accident
2.कर्करोग Cancer
3.मेंदूशी संबंधित आजार Diseases related to the brain
4.हृदयरोग heart disease
5.नवजात बाळकासंबंधित रोग Neonatal diseases
6.मूत्रपिंड प्रत्यारोपण Kidney transplant
7.डायलिसिस Dialysis
8.हृदय प्रत्यारोपण heart transplant
9,10.CVA व Bone Marrow. Transplant
11.यकृत प्रत्यारोपण Liver transplant
हि योजना कोणासाठी आहे ?
१. महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना. २. चॅरिटी हॉस्पीटल ३. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम (RBSK) या तीनही योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकिय समितीमार्फत तपासून या योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाते .
महत्वाची सूचना : रुग्ण रुग्णालयात असतानाच हि आर्थिक मदत मिळू शकेल , रुग्णाला दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला असेल / उपचार पूर्ण झाले असतील तर या योजनेमार्फत मदत मिळणार नाही . म्हणजेच रुग्ण दवाखान्यात असण्याच्या कालावधीतच अर्ज सादर करून मदत मिळवायची आहे .
अर्जाचा नमुना डाउनलोड कसा करावा ?
अर्जाचा नमुना इथे क्लीक करून अर्ज डाउनलोड करून घ्या .
योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
डाउनलोड केलेला अर्ज प्रिंट करून त्यात रुग्णाचे सर्व तपशील भरून घ्या .
भरलेल्या फॉर्मसोबत खाली नमूद केलेली सर्व कागदपत्रे जोडावीत.
अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी.
-
अर्ज (विहीत नमुन्यात दर्शवल्याप्रमाणे )
-
रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
-
रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
-
संबंधीत आजाराचे रिपोर्ट Medical Reports.
-
वैद्यकिय खर्चाचे अंदाजपत्रक / प्रमाणपत्राची मुळप्रत Original Copy डॉक्टरांच्या सही शिक्यासह तसेच खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन civil surgeon यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)
-
तहसिलदार कार्यालयकडून उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु. 1.60लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)
-
रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर Online System वर असल्याची खात्री करावी.
-
रुग्णाचा अपघात झाला असल्यास,Police station FIR किंवा MLC असणे आवश्यक आहे.
-
अवयव प्रत्यारोपण organ transplant असल्यास रुग्णालयाचे मान्यता प्रमाणपत्र अथवा ZTCC येथे नोंदणी केल्याची पावती जोडणे आवश्यक आहे.