health benefits of turmeric curcumin हळदीचे आरोग्यदायी फायदे

0
352
turmeric benifits

हळदी – आयुर्वेदातील अस्सल सोनं health benefits of turmeric in marathi

मित्रांनो, आपल्या रोजच्या जेवणामध्ये अधिराज्य गाजवणारी हळद फक्त मसालाच नाही, तर आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे.खऱ्या अर्थाने ayurveda तील सोनं म्हणजे हळद तर मग आज आपण या बहुगुणी अश्या सोन्यासारख्या हळदीचे आरोग्याच्या दृष्टीने महत्व समजून घेणार आहोत .

हळदीचे पाणी कसे तयार करावे ? turmeric water health benifits
एक ग्लास कोमट पाण्यात साधारणता एक छोटा चमचा हळद टाकून चांगल्या प्रकारे ढवळून घ्या पाच मिनिटानंतर हे हळदीचे पाणी पिण्यासाठी तयार आहे . अशा प्रकारे हे बहुगुणी हळदीचे पाणी प्यायल्यानंतर तुम्हाला खालील प्रमाणे आरोग्यदायी फायदे होतात .haldi pani

१. वेदना शामक हळद pain killer : हळदीमध्ये क्युर्क्युमिन turmeric curcuma नावाचं घटक असतं, जे शरीरातील दाह / वेदना कमी करण्यास मदत करतं. सांधेदुखीचा त्रास, त्वचेवरील खाज , त्वचारोग आणि जखमा यावर हळदीचा लेप अतिशय फायदेशीर आहे.turmeric as pain killer

२ . जखमा भरून टाकणारी antiseptic turmeric wound heal faster : क्युर्क्युमिन जखमा भरून टाकण्याची प्रक्रिया सुलभ आणि जलद करते. हळदीमधील Curcumin हे रक्त शुद्ध करते आणि जिवाणूंचा विरोध करते, त्यामुळे जखमा लवकर बऱ्या होतात. आयुर्वेदात हळदीला जंतुनाशक म्हणून खूप महत्व आहे .antiseptic turmeric

३. हृदयाचा मित्र हळद : हळदी ररक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते आणि रक्तप्रवाह सुधारते, त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. हृद्यरोगापासून बचाव करण्याचे हळद हे प्रभावी औषध आहे .

४. कर्करोग निरोधी: हळदीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि Curcumin कर्करोगाच्या पेशींचा प्रतिकार करतात. विशेषतः स्तन, कोलोन आणि त्वचेच्या कर्करोगावर हळदीचा प्रभाव दाखवणारे अभ्यास शास्त्रज्ञानी दाखवून दिले आहेत.mother sparsh after bite turmeric balm

५. अल्जायमरचा सामना: हळदी वृद्धपकाळात होणाऱ्या अल्जायमरसारख्या न्यूरोडीजेनेरेटिव्ह आजारांच्या वाढीला विरोध करण्यास मदत करते . हळदीमुळे स्मरणशक्ती सुधारते आणि मेंदूच्या आरोग्यात सुधारणा होते .curcuma longa

६. मधुमेहावर लढा: हळदी रक्त साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते, त्यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.

७. रोगप्रतिकारशक्ती बूस्टर: हळदी रोगप्रतिकारशक्ती वाढवून शरीरास आजारपासून लढण्याची क्षमता वाढवते, त्यामुळे सर्दी, खोकला आणि इतर संसर्गजन्य आजारांपासून आपले रक्षण होते.immunity booster turmeric

८. पित्त साफ करणारी: हळदी शरीरातील वाढलेले पित्त साफ करून यकृताची कार्यक्षमता वाढवते, त्यामुळे पित्तसंबंधी त्रास कमी होतात.आणि शरीर निरोगी राहते .

9. त्वचेसाठी वरदान: हळदीमध्ये असलेले अँटिसेप्टिक गुण त्वचेवरील मुरुम आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. हळदीचा लेप त्वचेला चमकही देतो.anti aging turmeric

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image