आज या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला aadhar card मध्ये आपला पत्ता कशाप्रकारे चेंज किंवा अपडेट करावा याबद्दल माहिती सांगणार आहे .
how to change address in aadhar card information in marathi
बहुतेकदा असं होतं की काही कारणास्तव आपला घरचा पत्ता बदलावा लागतो आणि अशावेळी घरचा पत्ता कायमस्वरूपी बदलला असेल तर महत्त्वाच्या अशा सरकारी कागदपत्रांवर देखील तो पत्ता बदलावा लागतो . असेच एक महत्त्वाचे सरकारी कागदपत्र म्हणजे e aadhar आधार कार्ड . हल्ली प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड चे डिटेल uid तसेच आधार कार्ड वरील पत्ता व्यवहारासाठी ग्राह्य धरला जातो म्हणूनच तुम्हाला जर आपल्या आधार कार्ड वरील आपला एड्रेस बदलावयाचा असेल तर हे बदल करण्यासाठी आधी तुम्हाला जवळच्या आधार केंद्रात adhaar centre nearby जावे लागत असे पण आता 
खालील स्टेप्स प्रमाणे तुम्ही घरबसल्या आधार कार्ड वरील पत्ता बदलण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
1.सर्वात आधी खाली दिलेल्या लिंक वर e uidai aadhar जाऊन लॉगिन करावे लागेल.
लिंक https://myaadhaar.uidai.gov.in/
लॉगिन करण्यासाठी आपला aadhar card number UID प्रविष्ट करावा त्यानंतर खाली दिलेल्या Captcha जसाच्या तसा लिहावा . आता Send OTP या ऑप्शन वर क्लिक करावे. आता तुमच्या आधार कार्डची जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी आला असेल तो ओटीपी क्रमांक इथे प्रविष्ट करून लॉगिन करावे.
2.लॉगिन केल्यानंतर पुढील पान ओपन होईल त्यामध्ये ऍड्रेस अपडेट Address update या पर्यायावर क्लिक करावे. या ऑप्शन मध्ये Update aadhar online वर क्लिक करावे.
3.आता एक नवीन पेज ओपन होईल व तिथे हे एड्रेस अपडेट कसे होईल याबद्दल माहिती दिलेली असेल त्याच पेजवर खाली Scroll करून Procced to Update Aadhar आधार या ऑप्शन वर क्लिक करावे.
4.नवीन पेज ओपन होईल तिथे ऍड्रेस हा ऑप्शन सिलेक्ट करून त्याखाली Proceed to update aadhar वर क्लिक करावे .
5. यापुढे तुम्हाला तुमचा एड्रेस बदलण्यासाठी फॉर्म दिसू लागेल तिथे तुम्हाला तुमचा नवीन बदललेल्या ऍड्रेस टाकून व्यवस्थित सर्व डिटेल्स भरले गेल्याचे खात्री करावी आणि अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनमध्ये योग्य असे डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यावे.
6.डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर नेक्स्ट बटन वर क्लिक करावे आता तुमच्यासमोर तुम्ही तुमच्या ऍड्रेस मध्ये केलेले बदल दिसून येतील तसेच तुम्ही कोणते डॉक्युमेंट अपलोड केले आहेत ते सुद्धा दिसून येईल इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा काळजीपूर्वक तुम्ही भरलेल्या डिटेल्स चेक करावे काही गडबड असल्यास एडिट ऑप्शन वर क्लिक करून नव्याने तुम्ही ऍड्रेस लिहू शकता एकदा सर्व खात्री करून झाल्यानंतर नेक्स्ट बटन वर क्लिक करावे.https eaadhaar uidai gov in
7.आता पुढील ऑप्शन वर आल्यानंतर तुम्हाला ऍड्रेस अपडेट या सेवेसाठी पन्नास रुपयाची शुल्क भरावे लागणार आहे ते ऑनलाईन भरून घ्यावे.
8.अशाप्रकारे आधार कार्ड मध्ये ऍड्रेस अपडेट साठी तुमचा अर्ज यशस्वीरित्या भरला गेला आहे आपल्या अर्जाची सद्यस्थिती जाण्यासाठी पुन्हा डॅशबोर्ड वर येऊन सर्वात खालील ऑप्शन REQUESTS इथे तुमच्या अर्जाची सद्यस्थिती तपासावी.
तर मग मित्रांनो अशा प्रकारे आपण घरबसल्या आपल्या आधार कार्ड वरील पत्ता बदलू शकतो जर तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर आम्हाला आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून आमच्या या ब्लॉगला सबस्क्राईब करावे , धन्यवाद.