Hotel Restaurant Style चमचमीत ग्रेव्ही बनवा आता घरच्या घरी Instant Premix Recipe marathi in english

0
1177
gravy

आता घरात अचानक पाहुणे आले किंवा जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तर हॉटेल सारखी चमचमीत ग्रेव्ही बनवा आता घरच्या घरी तेही अतिशय कमी वेळात . आपण chicken gravy,mushroom gravy,onion gravy,tomato gravy,kalan gravy यांसारख्या कित्येक ग्रेव्ही च्या रेसिपी बनवल्या असतील पण आज आपण इन्स्टंट ग्रेवी प्रीमिक्स पावडर बनवायला शिकणार आहोत . ज्या झटपट तयार होतील आणि बराच काळ टाकूनही राहतील . आयत्या वेळी फक्त त्यात पाणी आणि उकडलेल्या भाज्या मिक्स करून आपल्या आवडीची कोणतीही भाजी बनवू शकतो. marathi in english

Table of Contents

रेड ग्रेव्ही मिक्स Instant

साहित्य :३ लवंग.२ दालचिनी,१ टी स्पून चाट मसाला,१/४ टी स्पून गरम मसाला ,४ टेबल स्पून मिल्क पावडर,१ टी स्पून ओनीयन पावडर , १/२ टी स्पून गार्लिक पावडर, मीठ,१ टेबल स्पून कॉर्न फ्लॉवर,पाव टी स्पून कसुरी मेथी,१ वेलदोडा,१/२ टी स्पून जिरे ,तमालपत्र,१/४ कप काजु ,१ १/२ टेबल स्पून टोम्याटो पावडर,१/२ टी स्पून जिंजर पावडर,१टी स्पून कसुरी मेथी ,१ टी स्पून हळद ,१ टेबल स्पून कश्मिरी लाल तिखट,एक चिमूट  लाल कलर,१ टेबल स्पून खसखस ,१ टेबल स्पून मगज बी,१/२ टेबल स्पून तीळ ,

कृती

 1. पॅनमध्ये लवंग, दालचिनी, आणि वेलदोडे, जिरे, तमालपत्र परतून घ्या. बाजूला काढून ठेवा.

 2.  परत काजु, खसखस, मगज बी आणि तिळ दोन मी परतून घ्या.

 3. गार झाल्यावर मसाले आणि वरील सगळे मिश्रण बारीक करून घ्या.

 4. मिक्सर च्या भांड्यात बारीक केलेले मिश्रण आणि राहिलेलं सर्व साहित्य ऐकत करून मिक्सर मधून मिक्स करा.

 5. ह्या मिश्रणात पाणी घालून पाहिजे तेव्हा रेड ग्रेव्ही करून वापरा. 

 

 व्हाईट ग्रेव्ही मिक्स Instant :

साहित्य : ३ लवंग,२ दालचिनी,१ वेलदोडा,१/२ टी स्पून जिरे ,तमालपत्र,१/४ कप काजु ,१ टेबल स्पून खसखस ,१ टेबल स्पून मगज बी ,१/२ टेबल स्पून तीळ,४ टेबल स्पून मिल्क पावडर ,१ टी स्पून ओनीयन पावडर , १/२ टी स्पून गार्लिक पावडर ,१ टी स्पून चाट मसाला,१/४ टी स्पून गरम मसाला.१ टेबल स्पून कॉर्न फ्लॉवर, पाव टी स्पून कसुरी मेथी ,मीठ

कृती:

 1. पॅन मध्ये लवंग, दालचिनी, आणि वेलदोडे, जिरे, तमालपत्र परतून घ्या. बाजूला काढून ठेवा.

 2.  परत काजु, खसखस, मगज बी आणि तिळ दोन मी परतून घ्या.

 3. गार झाल्यावर मसाले आणि वरील सगळे मिश्रण बारीक करून घ्या.

 4. मिक्सर च्या भांड्यात बारीक केलेले मिश्रण आणि राहिलेलं सर्व साहित्य ऐकत करून मिक्सर मधून मिक्स करा.

 5. ह्या मिश्रणात पाणी घालून पाहिजे तेव्हा व्हाईट ग्रेव्ही करून वापरा.

 

यलो ग्रेव्ही मिक्स intant :

साहित्य :

३ लवंग,२ दालचिनी,१ वेलदोडा,१/२ टी स्पून जिरे ,१ टी स्पून चाट मसाला,१/४ टी स्पून गरम मसाला,१ टी स्पून हळद ,तमालपत्र ,१/४ कप काजु ,१ टेबल स्पून कॉर्न फ्लॉवर,पाव टी स्पून कसुरी मेथी ,मीठ,१ टेबल स्पून टोम्याटो पावडर,१/२ टी स्पून जिंजर पावडर ,१टी स्पून कसुरी मेथी,१ टेबल स्पून खसखस ,१ टेबल स्पून मगज बी  ,१/२ टेबल स्पून तीळ  ,४ टेबल स्पून मिल्क पावडर ,१ टी स्पू

न ओनीयन पावडर ,१/२ टी स्पून गार्लिक पावडर ,१/२ टी स्पून लाल तिखट ,१/२ टी स्पून किचन किंग मसाला

 कृती

 1. पॅन मध्ये लवंग, दालचिनी, आणि वेलदोडे, जिरे, तमालपत्र परतून घ्या. बाजूला काढून ठेवा.

 2.  परत काजु, खसखस, मगज बी आणि तिळ दोन मी परतून घ्या.

 3. गार झाल्यावर मसाले आणि वरील सगळे मिश्रण बारीक करून घ्या.

 4. मिक्सर च्या भांड्यात बारीक केलेले मिश्रण आणि राहिलेलं सर्व साहित्य ऐकत करून मिक्सर मधून मिक्स करा.

 5. ह्या मिश्रणात पाणी घालून पाहिजे तेव्हा यलो ग्रेव्ही करून वापरा.

कोणत्या ग्रेव्हीत कोणती भाजी करावी

रेड ग्रेव्ही :मटार पनीर, पनीर मसाला, भरली वांगी, घोले, उसळी, राजमा मसाला, दही वाली पनीर सब्जी, तवा सब्जी ,दम आलू, शेव भाजी, पाटवड्या, सर्व्ह कोफ्ता करी, मश्रुम भाज्या, शाही पनीर, नवरत्न कुर्मा, कुर्मा भाजी,  , व्हेजिटेबल हंडी, व्हेज कोल्हापुरी.

यलो ग्रेव्ही:  मटार पनीर, भरली वांगी, मसाला भेंडी, गट्टा करी, काजु करी, मेथी पनीर, मिक्स बेक व्हेजिटेबल. पाटवड्या, सर्व्ह कोफ्ता करी, मश्रुम भाज्या, कॉर्न कुर्मा,

व्हाईट ग्रेव्ही:मेथी मलई मटार, मलई कोफ्ता करी, व्हेज जयपूर, चीज पिझ करी, सोया मेथी मटार, खोया पनीर मटार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image