आरबीआय ने 2024 साठी यूपीआय पेमेंट upi payment साठी काही नियम ठरवलेले आहेत ते आपण पाहूया
ॲप लॉक upi app lock: पहिला नियम असा की 2023 मध्ये तुम्ही वर्षभर न वापरलेले ॲप आपोआप लॉक होतील. Google pay app, phonepe app, bhim app, amazon pay app, paytm app, bhim upi यापैकी कोणताही ॲप तुमच्या मोबाईल मध्ये असेल आणि संपूर्ण वर्षभरात तुम्ही तो एकदाही वापरला नसेल तर आरबीआयकडून सिक्युरिटी रीजन साठी तो ॲप आपोआप लॉक केला जाईल.
डेली पेमेंट लिमिट : यूपीआय वर आता डेली पेमेंट लिमिट लावण्यात येणार आहे. यूपीआयच्या डेली पेमेंट लिमिट असणार आहे एक लाखापर्यंत एक लाखावरील कोणताही व्यवहार तुम्ही आता एका दिवसात करू शकणार नाही.
स्पेशल पेमेंट लिमिट :स्पेशल पेमेंट लिमिट हे पाच लाखापर्यंत केले जाणार आहेस्पेशल पेमेंट लिमिट म्हणजे शाळा कॉलेज हॉस्पिटल मधील फी आणि इथले बिल हे सर्व व्यवहार तुम्ही एक दिवसांमध्ये पाच लाखापर्यंत करू शकता.
ट्रांजेक्शन सेटलमेंट टाईम : ट्रांजेक्शन सेटलमेंट टाईम हा आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल असणार आहे सायबर सिक्युरिटीने आतापर्यंत होणारे सायबर क्राईम लक्षात घेता हा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता जानेवारी 2024 पासून दोन हजार रुपया पर्यंतचे व्यवहार पूर्ण होण्यासाठी चार तासाचा कालावधी लागणार आहे. आतापर्यंत यूपीआय द्वारे केलेले ट्रांजेक्शन पूर्ण होण्यासाठी काही सेकंदाचा कालावधी लागत होता पण जानेवारी 2024 पासून दोन हजार रुपयाहून अधिक व्यवहार पूर्ण होण्यासाठी चार तासाचा कालावधी लागणार आहे तसेच हा नियम फक्त तुम्ही नवीन व्यक्तीशी केलेल्या व्यवहारासाठी लागू असणार आहे म्हणजेच याआधी तुम्ही डेली बेसिसवर कोणाशी व्यवहार करत असाल तर त्या व्यक्तीशी व्यवहार करण्यासाठी हा नियम लागू नसणार आहे.
आता यामुळे एक नवीनच प्रश्न उद्भवणार आहे म्हणजे समजा या व्यवहाराला चार तासांपेक्षा अधिक वेळ लागणार असेल तर तुम्ही एखादा किराणा मालाच्या दुकानात किंवा हॉटेलमध्ये दोन हजार रुपयांपेक्षा जास्त पेमेंट करणार असाल तर समोरचा दुकानदार किंवा हॉटेल मालक हे पेमेंट स्वीकारेल की नाही याबाबत शंकाच आहे.
यूपीआय ट्रांजेक्शन कॅन्सल ऑप्शन :जर तुम्ही कुठल्या नवीन व्यक्तीसोबत यूपीआयने ट्रांजेक्शन केला तर तो व्यवहार पूर्ण होण्यासाठी चार तासाचा कालावधी तर लागणारच आहे पण या चार तासांमध्ये तुम्ही तो व्यवहार कॅन्सल सुद्धा करू शकता. यामुळे होणारा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही तुमचे पैसे परत सुद्धा मिळू शकतात जर चुकून तुमच्या हातून पैसे गेले असतील तेथे तुमच्या अकाउंटला चार तासाच्या आत कॅन्सल केल्यास परत येऊ शकतात तसेच कोणी चोरी करण्याच्या उद्देशाने किंवा फसवून तुमच्याकडून पैसे काढले असतील तर चार तासाच्या आत तुम्ही तो व्यवहार पूर्णपणे कॅन्सल करू शकता आणि तुमची पूर्ण रक्कम तुमच्या बँक अकाउंट मध्ये मिळेल.
यूपीआय अकाउंट यूजर नेम : तुमचा बँकेच्या अकाउंट मध्ये असलेल्या नाव आता यूपीआय ट्रांजेक्शन मध्ये डिस्प्ले होणार आहे. आता तुम्ही यूपीआय द्वारे कुठेही पेमेंट करायला गेल्यास त्या विक्रेत्याचा खरं नाव तुम्हाला यूपीआय ट्रांजेक्शन मध्ये दिसणार आहे त्यामुळे पारदर्शकता वाढण्यास खूप मदत होणार आहे