वाढदिवसाच्या शुभेच्छा birthday wishes in marathi

0
372

आपल्या प्रियजनांचा वाढदिवस आपल्याला नेहमीच प्रिय असतो . आपल्या मित्र मैत्रिणींना आपण यानिमित्ताने वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवत असतो . त्याच शुभेच्छा जर मराठीत birthday wishes in marathi असतील तर त्यातून एक वेगळंच प्रेम आणि मातृभाषेविषयी आपुलकी दिसून येते . मातृभाषेतुन व्यक्त केलेल्या भावना हृदयापर्यंत नक्कीच लवकर पोहचतात . Happy birthday in marathi birthday wishes for sister in marathi birthday wishes for mother in marathi

Table of Contents

” आज तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस म्हणजेच तुमचा वाढदिवस . तुमच्या सर्व ईच्छा आकांक्षा पूर्ण होवोत . तुम्हाला सर्व सुख समाधान आणि ऐश्वर्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना . वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा “

“आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी नवीन संधी आणि सुयश घेऊन येवो . तुमचे आयुष्य आनंदाने आणि सुखसमृद्धीने भरभरून जावो. जन्मदिनाच्या अनंत शुभेच्छा .” 

 

 “सूर्याप्रमाणे तुझे तेज तळपत राहो

पर्वताप्रमाणे यश तुझे अविचल राहो .
समुद्रासारखे धैर्य तुझ्या अंतरी राहो .

दशदिशा तुझ्या यशाने उजळून जावो .

आयुष्यात खूप खूप यशस्वी हो .
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा “

 

“आज तुमचा जन्मदिवस म्हणजेच आयुष्यतील एक अनमोल क्षण . या खास दिनी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत , तुम्हाला यशाच्या नवनवीन संधी प्राप्त होवोत ह्याच मनापासून शुभेच्छा .”

“भावासारख्या मित्राला वाढदिवसच्या खूप खूप शुभेच्छा . या शुभदिनी तुम्हाला माझ्याकडून शांती प्रेम आणि भरभराटीच्या मनःपूर्वक शुभेच्छा .तुमचा वाढदिवस मजेत आनंदात आणि उल्हासात जावो . वाढदिवस अभिष्टचिंतन मित्रा .”

“तुमचा वाढदिवस म्हणजे आयुष्यातील खास क्षण .
हे सोनेरी क्षण तुमच्या आयुष्यात नेहमीच येत राहो .
तुमचे आयुष्य यश आणि प्रेमाने भरून जावो . हीच ईश्वरचरणी प्रार्थना .” 

भाऊ नसलास तरी भावातून अधिक आहेस
जन्माने सख्खा नसला तरी मैत्रीने आपला आहेस
मैत्रीच्या दुनियेतील राजामाणूस तू
माझा मित्र तत्वज्ञ वाटाड्या “मितवा” आहेस .
लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

“आज तुमचा वाढदिवस आनंदात सुखासमाधानात जावो. विद्याभ्यासात तसेच आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात तुमची उत्तरोउत्तर प्रगती होत जावो . तुमच्या सारख्या प्रियजनांचा सहवास आम्हाला नेहमीच लाभो . हॅप्पी बर्थडे”

” नव्या संकल्पांच्या नव्या दिशा
पदोपदी लाभो यशाचीच आशा
जीवनात येईल तुमच्या सुखाची अभिलाषा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा “

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image