तोंडाची चव गेली असल्यास किंवा भूक वाढवण्यासाठी healthy appetizers म्हणून सूपचं विचार केला जातो. healthy diet plan मध्ये सूप नेहमी अग्रस्थानी असते .वजन कमी करण्यासाठी weight loss वाल्या मंडळींकडून healthy soup नेहमीच प्यायले जाते . Diet Plan नुसार Fat Burning करण्यासाठी सूप फायदेशीर ठरतात
भूक वाढविणारा, पचण्यास हलका, कमी खर्चाचा, करण्यास सुलभ आरोग्यदायी आणि रुची आणणारा असा पदार्थ कोणता? अर्थात् ‘सूप’च. परंतु असे असूनही आणि सूप हा पदार्थ लोकप्रिय असला तरी घरगुती जेवणात त्याचा व्यापक स्वीकार झाल्याचे आढळत नाही.बहुतांश मंडळी हॉटेलात आवर्जून ‘सूप’ने सुरुवात करतात. परंतु घरच्या आहारात मात्र आपल्याकडे त्याला अजूनही हक्काचे स्थान मिळालेले आढळत नाही. खरे तर सूप करण्यास लागणाराथोडका वेळ, किमान सामग्रीची आवश्यकता, आरोग्याच्या दृष्टीने त्याची उपयोगिता, आणि ‘सर्व्ह’ करण्याच्या पद्धतीबद्दल थोडीमहत्त्वाची माहिती असली, तर घरच्या आहारात सूपचा अंतर्भाव करण्याबाबत आपल्या मनातील अनुत्साह सहज दूर होईल. त्या दृष्टीने पुढील माहिती देत आहे.
सूपचे चविष्ट आणि आरोग्यदायी असे प्रकार Diet Soup Recipe खाली देत आहोत जे तुम्हाला नक्कीच आवडतील
1.प्लेन टोमॅटो सूप creamy tomato soup
साहित्य : ८-१० चांगले लाल टोमॅटो, १ टी स्पून किसलेले आले, १ टी स्पून किसलेले लसूण, अर्धा टी स्पून दालचिनी पावडर, अर्धा टी स्पून हळद, १ कप दूध,२ टी स्पून कॉर्नफ्लोअर, १ टी स्पून अमूलबटर, २-३ ब्रेडचे स्लाईस, चवीप्रमाणे मीठ.
वेळ : १५ मिनिटे
कृती : टोमॅटो बारीक चिरून तीन कप पाण्यात उकळत ठेवावे. त्यात आले, लसूण, मीठ, दालचिनी पावडर व हळद घालून चांगले शिजवावे. गार झाल्यावर मिक्सरमधून फिरवून गाळावे. पुन्हा मंद गॅसवर ठेवावे. एक कप दुधात कॉर्नफ्लोअरची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट वरील मिश्रणात घालून शिजवावी. सतत ढवळावे. उकळी आल्यावर गॅस बंद करावा.ब्रेडच्या स्लाईसच्या कडा काढून टाकाव्यात आणि ब्रेडचे चौकोनी तुकडे करावे. तव्यावर थोड्याशा तुपावर परतून कुरकुरीत करून घ्यावेत. गरम गरम सूप देताना त्यावर ५-६ ब्रेडचे तुकडे घालावेत.
2.मूगडाळ व व्हेजिटेबल सूप green gram moong soup
साहित्य : २ मोठे टोमॅटो, २ मोठे कांदे, १ टे. स्पून मूगडाळ, ५-६ कप पाणी,१ टे. स्पून बटर, १ बारीक चि
रलेला कांदा. अर्धा कप बारीक चिरलेला कोबी.अर्धा कप पालक- बारीक चिरून. १ लहान टोमॅटो बारीक चिरून. मीठ व मिरे पावडर चवीप्रमाणे. थोडे किसलेले चीज.
वेळ : ३० मिनीटे : कृती : टोमॅटो व कांदा यांच्या मोठ्या फोडी करा. मूगडाळ स्वच्छ धुऊन थोडे पाणी घाला व हे सर्व एकत्र करून कुकरमध्ये १० मिनिटे शिजवून घ्या. थंड झाले की मिक्सरमध्ये भाज्या एकजीव करा व पाणी
घालून गाळा व पातळ मिश्रण तयार करा. नंतर एका पातेल्यात बटर गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा परता व जरा तांबूस करा. त्यावर वरील पातळ मिश्रण ओता. हे मिश्रण चांगले उकळू द्या. उकळत असताना त्यात कोबी, पालक, टोमॅटो घाला. मीठ व मिरे पावडर चवीप्रमाणे घाला. २-३ मिनिटांनी गॅस बंद करा. हे तयार गरमागरम सूप बाऊलमध्ये घालून वरून किसलेले चीज जरूर घाला.
3.पालेभाज्यांचे सूप leaf vegetable soup
साहित्य : एक मोठा बटाटा सोलून फोडी करा, ३ मोठे टोमॅटो, ३ कांदे, अर्धी जुडी पालक,अर्धी जुडी लाल माठ, २ टे.स्पून लोणी, ३ पाकळ्या लसूण, तळलेले ब्रेडचे चौकोनी तुकडे,मीठ-मिरेपूड चवीपुरते.
वेळ : ४० मिनिटे : कृती : सर्व पालेभाज्या आणि कांदे-बटाटे-टोमॅटो चिरून चार कप पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये शिजवावे. गार झाल्यावर मिक्सरमधून एकजीव करून घ्यावे. हे मिश्रण एका मोठ्या पातेल्यात ओतावे व थोडे उकळवावे. जाड वाटल्यास आणखी पाणी घालावे. हे मिश्रण गाळू नये. हे सूप उकळल्यावर मीठ-मिरेपूड घालावे. लोणी गरम करून त्यात लसूण ठेचून त्याची फोडणी करावी व ती सुपावर ओतावी. बाऊलमध्ये तळलेले ब्रेडचे तुकडे घालून गरम सूप वाढावे.
4.कोलंबीचे सूप prawn soup
साहित्य : अर्धा किलो कोलंबी, २ टे. स्पून तेल, २ टे.स्पून लोणी, अर्धा टी स्पून आले-लसूण पेस्ट, ३ पातीच्या कांद्यांतले कांदे चिरून, १ गाजर सोलून व चिरून, ३ मोठे लाल टोमॅटो,१ स्लाईस ब्रेड, २ टे.स्पून तांदूळ, कोथींबीर (ऐच्छिक), २ कप कोलंबीचा स्टॉक, चवीपुरते मीठ, मिरेपूड, २ टे.स्पून व्हाईट वाईन (आवडत असल्यास)
वेळ : ४० मिनिटे : कृती : पेस्ट, कोलंबी सोलून स्वच्छ धुऊन एका पातेल्यात घ्यावी. त्यावर तीन कप पाणी घालावे. उकळी आल्यावर दोन कप पाणी राहील इतकेच उकळवावे. त्यातील कोलंबी बाजूला काढून ठेवावी. हा कोलंबीचा स्टॉक तयार झाला. जाड बुडाच्या पातेल्यात तेलावर कोलंबी गुलाबी होईपर्यंत परतावी. त्यावर आले-लसूण मीठ घालन चांगले परतावे. ती कोलंबी बाजूला काढून ठेवावी. त्याच पातेल्यात लोणी वितळवून, त्यात चिरलेले कांदे मंद गॅसवर परतावेत. त्याच वेळी त्यात गाजर, टोमॅटोचे तुकडे, तांदूळ व ब्रेडच्या स्लाईस घालाव्यात. सर्व परतून कोलंबीचा स्टॉक घालावा व मंद गॅसवर तांदूळ शिजेपर्यंत उकळत ठेवावे.नंतर सर्व मिश्रण मिक्सरमधून जरा जाडसर वाटून घ्यावे. पुन्हापातेल्यात काढून उकळत ठेवावे. चवीप्रमाणे मीठ, मिरेपूड घालावी.कोलंबी घालावी व शेवटी कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.
5.मनचाव सूप manchow soup
साहित्य : ५ कप चिकन स्टॉक, ४-५ बटण मशरुम्स, १ मध्यम गाजर, अर्धी भोपळी मिरची,१ छोटे टॉमॅटो, २ टे. स्पून बांबूशूट बारीक चिरून, टे. स्पून कोबी बारीक चिरून, स्पून किसलेले आले, टे. स्पून किसलेला लसूण, २ टे. स्पून सोयासॉस, अर्धा टी स्पून मीठ, साखर, अजिनोमोटो, व मिरे पावडर प्रत्येकी 1 स्पून लाल तिखट 1 स्पून तेल 1 स्पून कॉर्नफ्लोअर
कृती : प्रथम सर्व भाज्या बारीक चिरून घेणे. एका पातेल्यात तेल गरम करून, त्यावर लसूण, आले परता. त्यावर सर्व भाज्या घालून थोड्या परता. त्यांत तिखट व टोमॅटो घालून स्टॉक ओता. झाकण ठेऊन पाच मिनीटे मंद गॅसवर उकळत ठेवा. नंतर सोयासॉस, मीठ, अजिनोमाटो, साखर, मिरेपावडर घाला. एक उकळी आल्यावर त्यांत कॉर्नफ्लोअरची पेस्ट करून घाला. चमच्याने ढवळत राहून एक-दोन उकळ्या घ्या म्हणजे, कॉर्नफ्लोअर शिजेल. गरम गरमसूप बाऊलमध्ये घातल्यावर वरून तळलेले नूडल्स घाला.
चिकन नूडल सूप chicken noodles soup
वेळ : ४० मिनिटे : साहित्य : अर्धा कप शिजलेले चिकन (बारीक तुकडे करावे), १ कप शिजलेल्या नूडल्स, ६ कप चिकन-स्टॉक, अर्धा कप कोबी (चिरून उकडून घ्यावा), १ टी स्पून सोयासॉस, पाव टी स्पून अजिनोमोटो, १ टी स्पून कॉर्नफ्लोअर, १ टे. स्पून रिफाईंड तेल, पाव टी स्पून लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, मिरेपूड.
कृती : एका जाड बुडाच्या भांड्यात रिफाईंड तेल घालावे. चिकनचे तुकडे त्यात परतून घ्यावेत. त्यातच कोबी परतावा. त्यावर स्टॉक घालून उकळवावे. मीठ, मिरेपूड, अजिनोमोटो, तिखटव सोयासॉस इत्यादी घालावे. शिजलेल्या नूडल्स घालाव्यात. पाव कप पाण्यात कॉर्नफ्लोअरची पेस्ट करावी. ती पेस्ट त्यात घालावी. सर्व सूप चांगले उकळवावे व गरम गरम वाढावे