affiliate marketing म्हणजे काय ? त्यातून पैसे कसे कमवायचे?

0
459
affiliate marketing in marathi

एफिलिएट मार्केटिंगः ऑनलाईन कमाईचा स्मार्ट रस्ता! affiliate marketing programs. 

जर तुम्ही घरबसल्या इंटरनेटवरून कमाईसाठी  online earning , online job ,part time work  शोधत असाल तर आजचा हा ब्लॉग खास तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, तुम्ही फेसबुक वर कधी व्हिडिओ बघता बघता त्या व्हिडिओमध्ये असणारी वस्तू तुम्हाला आवडली आणि तुम्ही त्या वस्तूसाठी असलेल्या लिंक वर क्लिक करून ती वस्तू खरेदी केली, आणि त्या वस्तूच्या विक्रीवरून विक्री करणाऱ्या कंपनी शिवाय इतर व्यक्तींना सुद्धा पैसे मिळू शकतात ? होय! हे शक्य आहे एफिलिएट मार्केटिंगमुळे! पण नेमकं हे affiliate marketing म्हणजे काय ? Affiliate Marketing मधून पैसे कसे कमवतात ?आणि ते कसं चालतं ते वाचायला तुम्ही उत्सुक आहातच ना? चला तर, समजून घेऊया!

 

 

ॲमेझॉन amazon affiliate program , फ्लिपकार्ट तसेच nerdwallet affiliate program ,jio affiliate program ,wix affiliate marketing सारख्या कंपन्या मार्केटिंग चे प्रोग्राम चालवतात आणि ऑनलाइन काम करणाऱ्यांना कमाईचा एक नवीन मार्ग देतात.

एफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय? what is affiliate marketing in marathi 

सध्याच्या ऑनलाईन युगात आपण एखाद्या कंपनीचे उत्पादन विकत घेण्याआधी व्हिडिओ रिव्ह्यू , ब्लॉग पोस्ट किंवा सोशल मीडिया पोस्ट वाचतोच. एफिलिएट मार्केटिंगमध्ये तुम्ही याच पद्धती वापरता. तुम्ही एखाद्या कंपनीसोबत करार करून त्यांच्या उत्पादनांचा प्रचार करता. जेव्हा तुमच्या लिंकवर क्लिक करून कोणी त्या उत्पादनांची खरेदी करतो, तेव्हा तुम्हाला त्या विक्रीवर एक कमिशन मिळते.

अफिलिएट मार्केटिंग म्हणजे तुम्ही एखाद्या कंपनीच्या प्रोडक्टची लिंक सोशल मीडिया किंवा इतर ठिकाणी शेअर करता आणि एखादी व्यक्ती त्या लिंक वर क्लिक करून ती वस्तू खरेदी करते या खरेदी विक्रीतून कंपनीला नफा होतो आणि त्या नफ्यापैकी काही हिस्सा म्हणजेच तुमची कमिशन कंपनी तुम्हाला देते अशा प्रकारे अफिलिएट मार्केटिंग काम करते.

 

affiliate marketing हे कसं चालतं?

पार्टनर निवडणे: तुमच्या आवडीनुसार कंपन्या आणि त्यांचे उत्पादन निवडा. तुम्ही फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स, ब्युटी किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करू शकता.

प्रचार करणे: तुमच्या ब्लॉग, यूट्यूब चॅनल, सोशल मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्मवर उत्पादनांची समीक्षा, तुलना किंवा प्रात्यक्षीकरण व्हिडिओ तयार करून त्यात कंपनीची एफिलिएट लिंक टाका.

खरेदीची प्रक्रिया: जेव्हा कोणी तुमची लिंकवर क्लिक करून उत्पादन खरेदी करते, तेव्हा कंपनी तुमच्या खात्यात कमिशन टाकते. ही रक्कम कंपनी आणि उत्पादनावर अवलंबून असते.
फायदे काय?

कमी इन्व्हेशमेंट: तुमच्याकडे उत्पादन स्टॉक ठेवण्याची गरज नाही. फक्त प्रचार करा आणि कमाई करा!

फ्लेक्सिबल काम: तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करू शकता. हे पूर्णवेळ किंवा अंशवेळ धंदा म्हणून करू शकता.

अनेक क्षेत्रांची संधी: तुमच्या आवडी आणि कौशल्यांनुसार कोणत्याही क्षेत्रात काम करू शकता.

टिप्स आणि सूचना:

विश्वसनीय उत्पादनांची निवड करा: लोकांना फसवू नका. तुम्ही ज्या वस्तूंचा प्रचार करत आहात त्या वस्तू गुणवत्तेच्या असल्याची खात्री करा.

गुणवत्तेपूर्ण कंटेंट तयार करा: आकर्षक आणि माहितीपूर्ण कंटेंट लोकांना तुमच्या लिंकवर क्लिक करण्यास प्रवृत्त करेल.

ट्रॅक करा आणि विश्लेषण करा: तुमच्या लिंक्सवर किती क्लिक येतात आणि किती विक्री होते हे ट्रॅक करा. यामुळे तुमच्या कामगिरीवर सुधारणा करण्यास मदत होईल.

 

चला तर मग प्रत्यक्ष कामाला सुरुवात करूया, खाली दिलेल्या लिंक चा वापर करून आजपासूनच तुम्ही एफिलीएट मार्केटिंग ची सुरुवात करू शकता.

खालील लिंक वर जाऊन तुम्ही ॲमेझॉन साठी affiliate म्हणून काम करण्यासाठी स्वतःची नोंदणी करू शकता आणि ॲमेझॉन वरून मार्केटिंग करून पैसे कमवू शकता

Link : https://affiliate-program.amazon.in/

खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही फ्लिपकार्ट साठी affiliate म्हणून काम करू शकता.

Link : https://affiliate.flipkart.com/

 

एफिलिएट मार्केटिंग हा ऑनलाईन कमवईचा चांगला पर्याय आहे. पण मेहनत आणि प्लॅनिंग शिवाय यशस्वी होणे अवघड आहे. तुम्ही मेहनत घेतली तर हा रस्ता तुम्हाला यशपर्यंत नेईल!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image