आरबीआयने नुकतेच एक प्रसिद्धी पत्रक काढून UDGAM या पोर्टल बद्दल माहिती दिली आहे .RBI चे गव्हर्नर Shashikant das यांनी हे वेब पोर्टल लॉन्च केले आहे. या पोर्टल च्या मदतीने आता कोणालाही आपल्या नावे किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या नावे असलेली unclaimed म्हणजेच दावा किंवा हक्क न सांगितलेली रक्कम शोधता येणार आहे. udgam.rbi.org.in या संकेतस्थळावर हि सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे .
कित्येक जण बँका मध्ये अकॉउंट तयार करून विसरून जातात किंवा एकाच वेळी खूप ठिकाणी बँक खाती असल्यावर काही खात्यामंध्ये पैसे भरूनही ती खाती विसरून जातात किंवा दुर्लक्षित होतात . बरेचदा असे होते कि आपल्या जवळची व्यक्ती निधन पावल्यास त्या व्यक्तीचे आर्थिक व्यवहार आपल्याला माहित नसतात अश्यावेळी हे पोर्टल खूपच फायदेशीर ठरणार आहे आणि महत्वाची भूमिका बजावणार आहे .RBI UDGAM PORTAL
आता UDGAM portal द्वारे ज्या रकमेवर कोणीही दावा केला. नाही अशी रक्कम कोणाच्या नावे आहे तेर आपण पाहू शकतो. आणि त्या रकमेवर दावा करू शकतो किंवा बंद पडलेले बँक खाते पुन्हा सुरु करू शकतो .
rbi udgam marathi info
ग्राहकांच्या नावे असलेली बँकामध्ये पडून असलेली निनावी बेवारस रक्कम आता एकाच ठिकाणी शोधता येणार आहे .RBI ने नुकतेच तयार केलेलं वेब पोर्टल UDGAM (अनक्लेम डिपॉझिट्स – गेटवे टू ऍक्सेस ) लाँच केलेआहे . ज्याच्या मदतीने सामान्य व्यक्ती बँकांमध्ये आपल्या पडून असलेल्यारक्कम ठेवी शोधू शकते.unclaimed deposits gateway to access
बरेचदा असे होते कि आपल्या जवळची व्यक्ती निधन पावल्यास त्या व्यक्तीचे आर्थिक व्यवहार आपल्याला माहित नसतात अश्यावेळी हे पोर्टल खूपच फायदेशीर ठरणार आहे आणि महत्वाची भूमिका बजावणार आहे .
बँक ठेवीदाराने दावा न केलेल्या ठेवी शोधून त्यावर हक्क / दावा करू शकतील किंवा संबंधित बँकांना भेट देऊन बँकेचे खाते पुन्हा चालू करू शकतील. आरबीआयने सांगितल्याप्रमाणे , सध्या फक्त 7 बँकांमधील हक्क नसलेल्या ठेवींचाच तपशील वेबसाइटवर उपलब्ध आहे. इतर बँकांमधील ठेवींचे तपशील 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत टप्प्याटप्प्याने उदगम पोर्टलवर अपलोड केले जातील.
कोणत्या बँकेचा समावेश ?
डीबीएस बँक इंडिया लिमिटेड , साउथ इंडियन बँक लिमिटेड
स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, , धनलक्ष्मी बँक लिमिटेड, , सिटी ,सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकांतील unclaimed रकमेचा ठेवींचा समावेश आहे .