Amazon seller central अमेझॉन वर प्रॉडक्ट विकून पैसे कसे कमवावे ?

0
549
sell on amazon marathi information
marathi mazon seller account

तुम्हाला तुमचा घरगुती व्यवसाय अमेझॉन वर घेऊन जायचं आहे का ? तुम्ही छोटे व्यापारी आहात आणि आता amazon seller central registration करून अमेझॉन  वर तुमचा व्यापार वाढवायचा आहे का ?

घरगुती मसाले, चटण्या , लोणची फराळाचे पदार्थ लाडू चकल्या चिवडा शेव , घरगुती सजावटीचे सामान , साड्या , नक्षीकाम केलेले रुमाल , घरी तयार केलेले लोकरीचे कपडे एक ना अनेक सामान तुम्ही अमेझॉन वर विकू शकता तेही घरबसल्या .amazon seller central अकाउंट कसे तयार करावे याबाबद्दल माहिती या ब्लॉगमधून देणार आहोत . .sell on amazon marathi language

सर्वात आधी आपण अमेझॉन वर वस्तू विक्री करण्याचे फायदे बघूया.

१. तुम्हाला कोणतेच दुकान किंवा गाळा भाड्याने घ्यावे लागत नाही .
तुम्ही घरबसल्या ऑनलाईन ऑर्डर घेऊन घरातूनच वस्तू विकू शकता . या सर्व प्रक्रियेत अमेझॉन तुमच्या घरातून तुमचे पार्सल घेऊन जाईल आणि तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहचवेल त्यामुळे कुरियर आणि इतर बाबींचा तुम्हाला मनःस्ताप नसतो.amazon supplier central

२ .तुम्ही २४ तास वर्षाचे ३६५ दिवस ऑर्डर स्वीआकारून तुमचे प्रॉडक्ट विकू शकता .आणि तुमच्या मर्जीनुसार हवे तेव्हा ऑनलाईन सेवा बंदही ठेवू शकता .

३ . विक्री झालेल्या मालाची रक्कम टॅक्स आणि अमेझॉन फी तसेच कुरियर चार्ज वगळून तुमच्या बँक अकॉउंट ला जमा होते त्यामुळे उधारी सारख्या कटकटीपासून मुक्तता होते .

४. तुमचा माल विक्री करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण भारतच नव्हे तर संपूर्ण जग amazon seller central usa बाजारपेठ म्हणून उपलब्ध असते. तुम्ही जगाच्या कोणत्याही काना कोपऱ्यातून ऑर्डर स्वीकारू शकता आणि पैसे कमावू शकता .

५. अमेझॉन हि जगातील सर्वात मोठी इ कॉमर्स कंपनी आहे त्यामुळे तुमच्या प्रॉडक्टच्या विक्रीच्या संधी अमर्याद आहेत. तुम्ही तुमच्या कौशल्यानुसार अमर्याद विक्री करून लाखो करोडो रुपये कमावू शकता .

अमेझॉन वर विक्री करण्यासाठी खालील प्रमाणे कागदपत्रे तयार ठेवा .

१. पॅन कार्ड ( वैयक्तिक किंवा कंपनीचा ) *
२ . बँकेचे चालू खाते ( Current Acc ) *
३. जी एस टी क्रमांक GSTIN number *
४. गुमास्ता / व्यवसाय प्रमाणपत्र / FSSAI प्रमाणपत्र
५. ट्रेडमार्क प्रमाणपत्र
६. तुमचे प्रॉडक्ट ( ज्यावर प्रॉडक्ट चे नाव,किंमत आणि इतर आवश्यक माहिती
लिहलेली असेल – शक्यतो पॅकेजिंग चांगली असावी )

वरील सर्व कागदपत्रे PDF फॉरमॅट मध्ये स्वतंत्र पाने सेव्ह करून एका फोल्डर मध्ये ठेवावीत .

अमेझॉन वर विक्रेता म्हणून नोंदणी करण्याचे टप्पे : amazon seller central sign in process

१. https://sell.amazon.in/sell-online/become-a-seller कम्प्युटर वर ब्रॉवझर मध्ये हि लिंक ओपन करावी .

२. Start Selling या बटन वर क्लिक करा , त्यांनतर SIGN IN दिसेल त्यावर क्लिक करावे .

३. मोबाइल क्रमांक / ई मेल आयडी टाकून व्यवस्तीत सर्व माहिती भरून नवीन खाते Account तयार करावे .

४. पुढे Company / Business Name म्हणून GST प्रमाणपत्रावर नोंदणी असलेलेच नाव टाकावे .

५. यापुढील टप्यामद्ये अमेझॉन स्टोर चे नाव , व्यवसायाचे स्वरूप – श्रेणी यांची दाखवलेल्या लिस्ट मधून निवड करावी , पुढे तुमच्या व्यवसायाचा पत्ता , GST क्रमांक टाकून नोंदणी करत राहा .

६. नोंदणी प्रक्रियेत अमेझॉन कडून मागिलेल्या सर्व कागदपत्रांच्या PDF फाईल अपलोड कराव्यात .

नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर . थोड्याच दिवसात तुम्हाला तुमचे अकाउंट तुमचे प्रॉडक्ट लिस्ट करण्यासाठी रेडी असल्याचे सांगण्यात येईल . त्यावेळी तुमच्या प्रॉडक्ट संबंधी योग्य ती माहिती भरून लिस्टिंग करावे .sell on amazon information in marathi language

प्रॉडक्ट लिस्टींग साठी आवश्यक गोष्टी .

Table of Contents

१. तुमच्या प्रॉडक्ट ची विक्री किंमत ( MRP )
२. प्रॉडक्ट चे युनिक असे नाव
३. प्रॉडक्ट चे सर्व अँगल मधून किमान ५ ते ६ फोटो कमीत कमी १००० x १००० रिझोल्युशन सह
४. तुमच्या प्रॉडक्ट ची योग्य ती कॅटेगरी आणि HSN कोड गुगल करून शोधून ठेवावे .

एकदा प्रॉडक्ट लिस्टिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यास अमेझॉन कडून १५ मिनिटात अप्रूव्हल येतं आणि तुमचे प्रॉडक्ट आता तय्यार आहे संपूर्ण भारतात विक्रीसाठी .

तुम्हाला या प्रक्रियेत काहीही अडचण आल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image