आगरी बोली भाषेतील कवितासंग्रह “कनगा” काव्यरसिकांसाठी सज्ज – book publication

0
691
poems about love

आगरी बोली भाषेतील कवितासंग्रह “कनगा” काव्यरसिकांसाठी सज्ज

 ठाणे जिल्ह्यातील नामवंत कवी श्री . जयंत कृष्णा पाटील यांच्या “कनगा” या आगरी बोली भाषेतील कवितासंग्रहास आगरी युथ फोरम आयोजित “अखिल भारतीय आगरी महोत्सव २०२३ ” मध्ये प्रकाशनाचा बहुमान मिळाला आहे . दिनांक १९ डिसेम्बर २०२३ रोजी आगरी कोळी समाजातील विविध मान्यवरांच्या उपस्तितीत या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अश्या कवितासंग्रहाचे प्रकाशन होणार आहे .book publishers near me

 

poems about love self publish poetry book

आगरी बोली भाषेत “कनगा” म्हणजेच धान्य साठवण्यासाठी बांबूपासून तयार केलेलं एक छोटेखानी कोठार . श्री . जयंत पाटील यांचा कवितासंग्रह सुद्धा उत्तमोत्तम कवितांचा कोठारच म्हणावं लागेल . यात विविध विषयांवरील आगरी बोलीभाषेतील ७७ हुन अधिक कविता प्रमाण भाषेतील शब्दार्थांसहित उपलब्ध आहेत .एकूण १६० पानांचा हा कविता संग्रह डॉ. सदानंद पाटील यांच्या प्रस्तावनेने नटलेला आहे . कनग्याचे मुखपृष्ठ सुप्रसिद्ध चित्रकार श्री, प्रकाश पाटील यांनी साकारले असून IPS पोलीस आयुक्त रेल्वे श्री . रवींद्र शिसवे साहेब यांनी कनग्यास शुभेच्छा दिल्या आहेत .

नामवंत कवी श्री . जयंत कृष्णा पाटील हे कल्याणमधील कुस्तीसाठी सुप्रसिद्ध असलेल्या सापाड गावचे सुपुत्र आहेत . लहानपणापासूनच साहित्य आणि कलाक्षेत्राची आवड असलेले कवी जयंत हे एका खाजगी कंपनीत काम करता करता आपली साहित्यनिर्मितीची आवड जोपासत आहेत .best poetry

खास आगरी बोलीभाषेतील कविता यात त्यांचा हातखंडा आहे . आतापर्यंत त्यांनी आगरी बोलीभाषेत ७० हुन अधिक विषयांवर कविता लिहल्या आहेत ज्यात बोलीभाषेतील चालिरीती , सण उत्सव -परंपरा ,आगरी समाज जीवन , शेती मासेमारी तसेच भक्तिगीतांचाही समावेश आहे .

  • कवी श्री. जयंत हे वाणिज्य शाखेतील पदवीधर असून आतापर्यंत त्यांना “आगरी साहित्य शिरोमणी पुरस्कार २०२३ “,” सापाड गौरव पुरस्कार २०२२” अश्या विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे .

  • अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे-मुंबई प्रदेशांतर्गत कल्याण शहर अध्यक्ष पदी त्यांची निवड झाली असून अखिल भारतीय आगरी साहित्य संस्था अलिबाग येथून उपाध्यक्ष म्हणून साहित्य क्षेत्रातील कार्य सांभाळीत आहेत .

  • वॉट्सअँप च्या माध्यमातून आगरी बोलीभाषेतील एक आगळा वेगळा उपक्रम म्हणजेच “ आगरी साईत्य शाला ” . हा उपक्रम सुमारे ३०० हुन अधिक सदस्यांच्या मदतीने ते सांभाळत आहेत . या उपक्रमाची दखल विविध वृत्तपत्रांमध्ये सुद्धा घेण्यात आली आहे .best poetry

  • नुकतीच त्यांची ” आगरी अस्मिता साहित्य संमेलन ” येथे विशेषांक संपादक म्हणून निवड करण्यात आली आहे .

  • भारतात विविध ठिकाणी होणाऱ्या काव्यसंमेलनात तसेच आगरी महोत्सवात त्यांचा सक्रिय सहभाग आहे . तसेच विविध वृत्तपत्रे , मासिके , त्रैमासिक , काव्यसंग्रह , दिवाळी अंक अश्या अनेक माध्यमात त्यांचे सक्रिय लेखन आहे .poems about love.allama iqbal poems in urdu

तुम्हाला सुद्धा सुमधुर अश्या आगरी बोली भाषेतील हा कवितासंग्रह हवा असल्यास  9421674215 या क्रमांकावर वॉट्सअँप किंवा फोन कॉल च्या माध्यमातून घरपोच मागवू शकता .

खालील लिंक वर क्लीक करून तुम्ही श्री. जयंत कृष्णा पाटील यांनी स्वाक्षरी केली काव्यसंग्रहाची प्रत घरपोच विकत मागवू शकता . कृपया काव्यसंग्रह “कनगा ” विकत घेण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा .

https://wa.me/919421674215?text=मला%20तुमचे,पुस्तक%20कनगा%20विकत%20घ्यायचे%20आहे%20कृपया-अधिक-माहिती-द्यावी.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

CAPTCHA ImageChange Image