उपक्रम काही आगळे वेगळे काही मनातील.चिमुकल्यांचा रानभाज्या महोत्सव .
दिनांक:05/08/2023 रोजी जि.प.केंद्रशाळा गिरगाव आरजपाडा शाळेत रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
पावसाळ्याच्या दिवसात डोंगरकुशीत वसलेल्या परिसरात अनेक प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध होतात.त्यातील काही रानभाज्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त व
औषधीही असतात.सुरक्षित व पौष्टिक अन्न सध्या दुर्मिळ झाल्यामुळे सध्याच्या आधुनिक पिढ्यांना त्याची कल्पना नाही.
यासाठी लहान मुले विशेषतः तरुणाईला या रानभाज्यांची ओळख,महत्त्व,अनेक औषधी गुणधर्म आणि याचा प्रसार होण्यासाठी व रानभाज्यांची नव्याने ओळख व संवर्धन होण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
कंटोली , अजोला , धोधले , नाली भाजी. रानातील गवती चहा , लिंबोण्या ,कोवळ्या बांबूचे कोंब , रान कढीपत्ता , टेकळा , रानातील अळू ,गावठी सुरण इत्यादी रानभाज्यांची माहिती औषधी उपयोग या महोत्सवात पाहायला मिळाले .
महोत्सवाचे उद्घाटन गिरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री.वाघात सर यांच्या हस्ते करण्यात आले.त्यांनी रानभाज्यांच्या प्रत्येक स्टॉलवर जावून भाज्यांची माहिती घेतली तर काही भाज्या व परिसातील काही वनस्पींपासून बनवलेले पारंपारिक औषधी काढे यांची चवही चाखली.व शाळेतील सर्व शिक्षकांचे कौतुकही केले.
लहान वयातच विद्यार्थ्यांना रानभाज्याचे औषधी गुणधर्म समजले तर तरुणाई शेतीकडे वळतील.शेतात भाज्यांचे उत्पादन करून भविष्यात त्यांना उदरनिर्वाहाच्या,रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात असा विश्वास शाळेचे मुख्याध्यापक श्री.सोनवणे सर यांनी व्यक्त केला.
संकलन : @TeamArajpada